मुख्य बातमी
श्री रत्नागिरीचा राजा गणपतीचे दिमाखादार आगमन

रत्नागिरी : शहरात श्री रत्नागिरीचा राजा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गौरवशाली गणपतीचे आगमन ३ ऑगस्ट रोजी मंडळाचे अध्यक्ष आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अत्यंत भक्तिभावाने आणि जल्लोषात पार पडले.
मंडळाचे अध्यक्ष म्हणून हजारो गणेशभक्तांनी दाखवलेल्या प्रेमासाठी आणि उत्स्फूर्त सहभागासाठी मनःपूर्वक आभार मानतो, असे यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हणत सर्व गणेश भक्तांना धन्यवाद दिले.



