मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

परीक्षित पाटील यांना “उत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार” 

आबलोली (संदेश कदम) : प्रामाणिकपणे जनसेवा अंगीकारलेले प्रशासनातील उत्तम नेतृत्व, आपत्ती काळात गुहागर तालुक्यात उत्कृष्ट नियोजन करून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांना महसूल दिनात जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांच्या हस्ते उत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांना उत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार मिळाल्याबद्दल आबलोली गावचे सामाजिक कार्यकर्ते व ॲड. प्रमेय आर्यमाने, उद्योजक ओंकार बाईत यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तहसीलदार श्री. पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुक्यातील जनतेकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!