बियाणी बालमंदिरमध्ये अक्षरांची कार्यशाळा

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळ संचलित बियाणी बालमंदिरमध्ये पालकांसाठी अक्षरांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यामध्ये सोमनाथ दुकले यांनी मार्गदर्शन केले.
लेखनाला सुरुवात करण्यापूर्वीच्या प्राथमिक बाबी त्यांनी सांगितल्या. हातात पेन्सिल कशी धरावी, लेखनाची योग्य पध्दत याविषयी मार्गदर्शन केले. बालमंदिरचे विद्यार्थ्यांना अक्षरांची ओळख करून देत असताना चित्र वाचन व अक्षरवाचन असा सराव घ्यावा. लिखाणाला सुरुवात करण्यापूर्वी अक्षरांच्या अवयवांचा जास्तीत जास्त सराव करून घ्यावा, म्हणजे हस्ताक्षर नक्कीच सुंदर, वळणदार होईल. असे अनेक महत्वाचे टप्पे पालकांना सांगितले. कार्यक्रमासाठी शालेय समिती अध्यक्ष राजेंद्र कदम, प्रबंधक विनायक हातखंबकर, पालक उपस्थित होते. मुख्याध्यापिका सौ. धनश्री मुसळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.



