वरवडे माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे माध्यमिक विद्यालय, वरवडे येथे भारताचा स्वातंत्र्य दिन विविध स्पर्धा घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विचारे, खजिनदार दिवाकर जोशी, सहसेक्रेटरी संदीप सुर्वे, शाळेचे माजी विद्यार्थी प्रशांत पारकर, शिक्षक-पालक संघाचे सहसचिव चंद्रकांत विचारे तसेच सौ. सावंत, श्री. जाधव एस. के., सौ. देवरुखकर, श्री. पालशेतकर, श्री. चिले, श्री. कुंभार, सौ. कदम, सौ. पावसकर, श्री. महाडिक, श्री. प्रशांत (बाळू) विचारे उपस्थित होते.


प्रथमतः शाळेचे माजी विद्यार्थी प्रशांत पारकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ध्वजगीत, राज्यगीत, देशभक्तीपर गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रशालेत १२ ऑगस्ट रोजी आठवी ते दहावीच्या वर्गाची निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये पायल उमेश वासावे (इ. दहावी), कौस्तुभ राकेश पाष्टे (दहावी), वेद पद्माकर हेदवकर (आठवी) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. उत्तेजनार्थ पारितोषिक सिद्धी सचिन वीर (नववी) व आर्या चंद्रकांत विचारे (नववी) यांनी मिळवला. त्याचप्रमाणे १३ ऑगस्ट रोजी विद्यालयात दोन गटात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये इयत्ता पाचवी ते सातवी या गटात विहान प्रसाद होरंबे (पाचवी) याने प्रथम, उत्कर्षा सतीश साळवी (सहावी) व वेद शितेश आंबेरकर (सातवी) यांनी द्वितीय क्रमांक विभागून, तर ध्रुवी विष्णू पालशेतकर (सातवी) हिने तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ अथर्व प्रशांत गुरव (सहावी), परी सागर डोर्लेकर (सातवी), आराध्या समीर पोवार (सातवी) यांनी मिळवला. आठवी ते दहावी या गटातून पायल उमेश वासावे हिने प्रथम, तनया संतोष चौगुले हिने द्वितीय, तर कौस्तुभ राकेश पाष्टे (दहावी) व आर्या चंद्रकांत विचारे (नववी) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ जान्हवी अजित गावणकर (आठवी), आज्ञा चंद्रकांत विचारे (नववी), वेद पद्माकर हेदवकर (आठवी) यांनी मिळवला.


या स्पर्धेचे परीक्षण प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. एस. के. जाधव व सौ. पावसकर यांनी केले. या सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित असलेल्या पाहुण्यांमार्फत प्रमाणपत्रे व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धा शाळेच्या वक्तृत्व व कथाकथन विभाग प्रमुख सौ. कदम यांनी घेतल्या. त्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. चिले यांनी विभागामार्फत आर्थिक सहाय्य केले.
या सर्व कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. चिले यांनी केले. प्रशालेत स्वातंत्र्य दिन उत्साहात व आनंदात संस्थाचालकांच्या उपस्थितीत शिक्षकांच्या मार्गदर्शनाने सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागाने साजरा करण्यात आला.



