क्रीडामुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत संकल्प खाडे याचे यश

राजापूर : दिल्ली येथे १८ ते २० ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या १४ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत राजापूर तालुक्यातील संकल्प दीपक गुरव यांनी सहभाग घेतला होता. राजापूर तालुक्यातील टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन मधील पहिला राष्ट्रीय खेळाडू होण्याचा बहुमान त्याने पटकावला.
या स्पर्धेमध्ये १५ पेक्षा जास्त राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी जिल्हा प्रमुख मार्गदर्शक डॉ. योगिता खाडे तसेच टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन राजापूर तालुका प्रमुख प्रशिक्षक युवराज विलास मोरे हे संकल्प गुरवला मार्गदर्शन करत आहेत.



