मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
मनसे नेते वैभव खेडेकर यांच्यासह चारजणांची पक्षातून हकालपट्टी

खेड : सुरवातीपासून राज ठाकरे यांच्याशीच एकनिष्ठ राहून संपूर्ण कोकण पट्ट्यात मनसे पक्षाचे आव्हान उभ करणाऱ्या मनसे नेते वैभव खेडेकर, अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे, सुबोध जाधव यांना मनसे नेते अविनाश जाधव व संदीप देशपांडे यांनी पक्षातून हकालपट्टी केल्याचे पत्र दिले आहे.
या पत्रात पक्षाच्या धोरणाचे आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने बडतर्फ करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वैभव खेडेकर यांच्या भूमिकेकडे सर्वच कोकणचे लक्ष लागून राहिले आहे.



