वाहन क्रमांकाची नवीन मालिका; आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी ११ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात ११ सप्टेंबर रोजी दुचाकी वाहनांसाठी MH-08-BJ-0001 ते MH-08-BJ-9999 ही नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. ज्या दुचाकी/चारचाकी/परिवहन वाहन मालकांना नव्याने सुरू होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहीत शुल्क (तीनपट शुल्क) भरून हवे असतील त्यांनी ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा.
वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, गणेशनगर, कुवारबाव, ता. जि. रत्नागिरी येथे मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी गर्दी होते. त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो व नागरिकांनाही त्याचा त्रास होतो. हा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास सुलभतेने तो मिळावा यासाठी इच्छुकांनी आपला अर्ज उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, पॅनकार्ड, ओळखपत्र यांच्या साक्षांकित प्रतीसह DY RTO RATNAGIRI यांच्या नावे नॅशनलाईज/शेड्युल बँकेचा रत्नागिरी येथील डीडी जमा करावा. अर्जासोबत फोटो ओळखपत्र केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ४ तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५ अ मध्ये विहीत केल्या पत्त्याच्या पुराव्यांनी (आधारकार्ड, आधारकार्डला लिक असलेला मोबाईल क्रमांक, टेलीफोन बिल) साक्षांकित प्रत सादर करावी. दुचाकी/चारचाकी/परिवहन वाहनांची यादी १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. यादीमधील एकाच क्रमांकासाठी दोन किंवा जास्त अर्ज असल्यास यादीतील अर्जदारांना लिलावाकरिता जर जास्त रक्कमेचा डीडी जमा करावयाचा असेल तर त्यांनी १५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत सीलबंद पाकीटात कार्यालयात जमा करावा व त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कक्षात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर (संबंधित अर्जदार) लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विर्निदिष्ट शुल्कापेक्षा जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.
दुचाकी मालिकेतील वाहनांसाठी उर्वरित आकर्षित नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा.
दुचाकी वाहनांची यादी १६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. यादीमधील एकाच क्रमांकासाठी दोन किंवा जास्त अर्ज असल्यास दुचाकी अर्जदारांना लिलावाकरिता जर जास्त रक्कमेचा डीडी जमा करावयाचा असेल तर त्यांनी १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत सीलबंद पाकीटात कार्यालयात जमा करावा व त्याच दिवशी दुपारी ४.३० वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर (संबंधित अर्जदार) लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकांपासून १८० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही, तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकार जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी भरलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही.


