गोळप सडा दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळातर्फे भजनाचा जंगी सामना

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ साळवी नगर गोळप सडा येथे २६ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजता बुवा संदीप लोके विरुद्ध बुवा गुंडू सांवत यांचा भजनांचा २०×२० जंगी सामना होणार आहे.
२७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता गोंधळ जोगवा मागण्याचा कार्यक्रम, रात्री ७.३० वाजता दिवटी नाचण्याचा कार्यक्रम, रात्री १० वाजता गोंधळाची कथा, २८ सप्टेंब रोजी सायंकाळी ४ वाजता महिलांचा हळदी-कुंकू समारंभ, सायंकाळी ६ वाजता होममिस्टर स्पर्धा होईल. यासाठी केतन झगडे (9421707589) रात्री ९.३० वाजता दांडियारास, २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता पाककला स्पर्धा व रांगोळी स्पर्धा होतील. स्पर्धेसाठी केतन झगडे यांच्याशी संपर्क साधावा. त्यानंतर रात्री ९.३० वाजता दांडियारास होईल.
३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता होमहवन व कुवारी पुजन होईल. रात्री १० वाजता ५ ते २० वयोगटासाठी डान्स स्पर्धा होतील. रात्री ११ वाजता दांडियारास होईल. १ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता महाप्रसादाचे वाटप होईल. रात्री १० वाजता बक्षीस वितरण समारंभ, तर रात्री ११ वाजता शक्ती तुऱ्याचा जंगी सामना तुरेवाले शाहीर योगेश जाधव (रायगड) आणि शक्ती वाले शाहीर तेजल पवार यांचा जंगी सामना रंगेल. २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता दसरा मंदिरामध्ये सोने वाटपाचा कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता आरती, रात्री ९.३० वाजता दांडियारास होईल. ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता आरती-गान्हाणे, दुपारी ४ वाजता देवीची विसर्जन मिरवणूक निघेल. सायंकाळी ७.३० वाजता आरती होईल.
या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्ष सौ. निहा आनंद साळवी यांनी केले आहे.



