मुख्य बातमी

हनुमान नगर (रत्नागिरी) येथे सुसंस्कृत मित्र मंडळातर्फे गॅस सुरक्षा जनजागृती कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी : नवरात्रोत्सवाच्या उत्साहात शहरालगत असलेल्या हनुमान नगर येथील सुसंस्कृत मित्र मंडळाने सहाणेवर गॅस सुरक्षेबाबत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी सूर्या गॅस कंपनीच्या वतीने हनुमान नगरमधील रहिवाशांसाठी गॅसच्या सुरक्षित वापराबाबत मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गॅस सुरक्षेबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती घेतली. कार्यक्रमादरम्यान सूर्या गॅस कंपनीच्या तज्ज्ञांनी घरातील गॅस सिलेंडर आणि शेगडीचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, गॅस गळती झाल्यास काय करावे आणि संभाव्य धोके कसे टाळावेत, याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी आधुनिक गॅस सेफ्टी डिव्हाईसबद्दल माहिती देताना, हे उपकरण गॅस गळती झाल्यास स्वयंचलितपणे गॅसचा पुरवठा थांबवते, ज्यामुळे मोठा अपघात टाळता येतो, असे सांगितले.

हा माहितीपूर्ण कार्यक्रम हनुमान नगरमधील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला. अनेकांनी गॅस सुरक्षिततेबद्दल असलेले गैरसमज दूर झाल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!