ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या (दिल्ली) महाराष्ट्र राज्य कोकण प्रदेश उपाध्यक्षपदी अमृत गोरे यांची निवड
ऑल इंडिया धनगर समाज महासंघ (दिल्ली) महाराष्ट्र राज्य कोकण प्रदेश युवक आघाडीची कार्यकारिणी जाहीर : रत्नागिरी जिल्हा प्रभारीपदही अमृत गोरे यांच्याकडे

रत्नागिरी : ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली महाराष्ट्र राज्य कोकण प्रदेश युवक आघाडीची ५१ जणांची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, यात कोकण प्रदेश उपाध्यक्षपदी अमृत अंकुश गोरे यांची निवड करण्यात आली असून, रत्नागिरी जिल्हा प्रभारी म्हणूनही त्यांची वर्णी लागली आहे.
ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली महाराष्ट्र राज्य कोकण प्रदेश युवक आघाडीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई (विभाग) या जिल्ह्यातून ५१ पदाधिकाऱ्यांची निवड कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी कार्यकारणी राष्ट्रीय अध्यक्ष अजय पाल होळकर व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करत असल्याचे सांगितले. कोकणातील धनगर समाजाच्या उन्नतीसाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार करत संघटनेचे ध्येयधोरण कामाची पद्धत देखील त्यांनी जाहीर केले आहे. कोकणातील धनगर समाजाच्या उन्नतीसाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार करत त्यांनी यावेळी केला. वाडी-वस्तींसाठी रस्ते व दळणवळण सुविधा करणे, जातीचे दाखले मिळवण्यासाठी विशेष समितीची मागणी जातीचे दाखले व जात पडताळणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी करणे, काही ठिकाणी घरी आहेत पण घराखालील जमीन समाजाच्या नावावर नाही. घराखालची जमीन धनगर समाजाच्या नावे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शासकीय योजनेतून जिल्हास्तरीय पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सामाजिक व सांस्कृतिक भवन निर्मितीसाठी प्रयत्नशील, तालुकास्तरीय शैक्षणिक वसतिगृह किंवा सांस्कृतिक सभागृह निर्मितीसाठी प्रयत्न करणे, केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजापर्यंत पोहोचण्यासाठी महासंघाचे पदाधिकारी काम पाहतील. गावोगावी नेटवर्क सुविधा, इतर अडीअडचणी व समाजाच्या मागणीनुसार काही विषयाचे पाठपुरावे महासंघाच्या माध्यमातून करण्यात येतील. कोकणातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करणे, शैक्षणिक मार्गदर्शन, गुणवंतांचा सन्मान करून कोकणात शैक्षणिक गंगा आणण्याचे काम महासंघाच्या वतीने करण्यात येईल. शीर सलामत तो पगडी पचास असं धनगर समाजात म्हटले जाते त्यामुळे आपले आरोग्य चांगला असेल तर अनेक गोष्टी करता येतील. त्यासाठी कोकणातील समाजाच्या आरोग्यासाठी जनजागृती व उपक्रम, आरोग्य शिबिर राबवणे, त्याच प्रमाणे राज्यातील धनगर समाज एसटी आरक्षणाचा मुद्दा खूप महत्त्वाचा असून त्या मुद्द्यावरती ही लक्ष केंद्रित करणार सध्या चालू असलेल्या सर्व उपोषणांना आंदोलनाला ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेशच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. भविष्यात आरक्षणाबाबत पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा करून पुढील ध्येयधोरण ठरवणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आरक्षणासह समाजाच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी महासंघ कटिबद्ध राहील. कोकणातील स्थानिक संघटना, मंडळे, संस्था यांना सोबत घेऊन एकत्र काम करण्याचा निर्धार नवलराज काळे यांनी केला आहे. तसेच येणाऱ्या काळात पुढच्या पिढीसाठी आपण सर्व एकत्र संघर्ष करणे खूप गरज आहे. त्यामुळे प्रांतवाद, संघटना वाद, पोट जातीयवाद बाजूला ठेवून सर्वांनी धनगर म्हणून एकत्र येऊन काम करूया. त्यासाठी महासंघाशी आपण सर्वांनी जोडले जावे, असे आवाहन देखील श्री. काळे यांनी यावेळी केले.
दरम्यान, ५१ जणांमधून आठजणांना जिल्हा प्रभारीची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी म्हणून अमोल बाळकृष्ण जंगले, रत्नागिरी जिल्हा प्रभारी म्हणून अमृत अंकुश गोरे, रायगड जिल्हा प्रभारी म्हणून नरेश सुरेश कोकरे, पालघर जिल्हा प्रभारी म्हणून पांडुरंग गोरे, ठाणे जिल्हा प्रभारी म्हणून संजय कोंडीबा झोरे, मुंबई उपनगर जिल्हा प्रभारी म्हणून संतोष महादेव पटकारे, मुंबई जिल्हा प्रभारी म्हणून गुरुप्रसाद भैरू खरात, तर नवी मुंबई प्रभारी म्हणून रामचंद्र दशरथ शेळके यांची निवड करण्यात आली आहे.
अमृत गोरे यांच्याकडे रत्नागिरी जिल्ह्यातील धनगर समाजाचे युवा नेतृत्व म्हणून पाहिले जाते. आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून अमृत गोरे यांनी स्वतःकडे लक्ष वेधले असून, जिल्ह्यातील धनगर समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.
नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी हे समाजाच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजोपयोगी कामे करीत आहेत. त्यांच्या कार्याचा विस्तार अधिक जोमाने व्हावा व त्यांच्या कार्याची व्याप्ती वाढावी यासाठी त्यांची कार्यकारणीत त्यांची नेमणूक करण्यात आल्याचे श्री. काळे यांनी सांगितले.
श्री. काळे यांनी जाहीर केलेली ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेश कार्यकारणी अशी : कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज, विजयसिंह काळे (सिंधुदुर्ग). कोकण प्रदेश उपाध्यक्ष– सचिन ज्ञानदेव धायगुडे (पालघर), नरेश सुरेश कोकरे (रायगड), अमृत अंकुश गोरे (रत्नागिरी), अमोल बाळकृष्ण जंगले (सिंधुदुर्ग). कोकण प्रदेश सरचिटणीस– गुरुप्रसाद भैरू खरात (मुंबई). कोकण प्रदेश संघटन सरचिटणीस –संजय कोंडीबा झोरे (ठाणे), मंगेश गंगाराम शिंगाडे (सिंधुदुर्ग). कोकण प्रदेश चिटणीस– संदीप अशोक माने (ठाणे), मालोजी बऱ्या बोडके (रत्नागिरी), कोकण प्रदेश खजिनदार– विठ्ठल बिरू लांबोर (रायगड). कोकण प्रदेश सह खजिनदार – हितेश दाजी बर्गे (मुंबई). कोकण प्रदेश लेखा परीक्षक– रामचंद्र दशरथ शेळके (नवी मुंबई). कोकण प्रदेश संपर्कप्रमुख– पांडुरंग बमू गोरे (पालघर). कोकण प्रदेश सहसंपर्कप्रमुख– संतोष महादेव पटकरे (मुंबई उपनगर). कोकण प्रदेश संघटन मंत्री– रवींद्र विठ्ठल हिरवे (मुंबई उपनगर), हर्षद विजय फाले (सिंधुदुर्ग). कोकण प्रदेश कार्याध्यक्ष– प्रकाश पांडुरंग देसाई (ठाणे). कोकण प्रदेश उपकार्याध्यक्ष – सुरेश रामचंद्र कोकरे (रत्नागिरी). कोकण प्रदेश मीडिया प्रमुख– बापू सुरेश खरात (ठाणे). कोकण प्रदेश सहमीडिया प्रमुख – मनोहर रामचंद्र कोकरे (रत्नागिरी). कोकण प्रदेश प्रसिद्धीप्रमुख दत्तात्रेय रामा शेडगे (रायगड). कोकण प्रदेश सह प्रसिद्धीप्रमुख –लक्ष्मण तुकाराम बावदाने (ठाणे). कोकण प्रदेश कायदेशीर सल्लागार –ॲड. मिलिंद नारायण जाडकर (रत्नागिरी), ॲड. अविनाश बयाजी शेळके (ठाणे), ॲड. योगेश छबिलाल परदेशी (मुंबई). कोकण प्रदेश सल्लागार – रमेश शांताराम माने (मुंबई उपनगर), धनंजय सुरेश शेळके (रायगड), चंद्रकांत धोंडीराम गावडे (पालघर), किरण कोंडू ढवळे (मुंबई उपनगर), संदीप देऊ जंगले (सिंधुदुर्ग).
कोकण प्रदेशातील एकूण १० जिल्हाध्यक्ष व १० जिल्हा सरचिटणीस असे एकूण २० पदाधिकारी कोकण प्रदेश कार्यकारणी सदस्य असतील. यामध्ये ठाणे जिल्हाध्यक्ष सचिन गणपत झोरे, सरचिटणीस दत्ताराम विठ्ठल शेळके, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष गंगाराम साळसकर, सरचिटणीस सूर्यकांत अनंत बोडके, मुंबई उपनगर जिल्हाध्यक्ष संतोष तुकाराम जांगळी, सरचिटणीस ॲड. गणेश मानाजी शेळके, पालघर जिल्हाध्यक्ष विजय सिताराम यमकर, सरचिटणीस संदीप गंगाराम झोरे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रसाद पद्माकर कोकरे, सरचिटणीस साहिल रमेश गोरे, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुनील अशोक आखाडे, सरचिटणीस मनोहर बाबा ढेबे, रायगड (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष नितीन कोंडीराम महाबळे, सरचिटणीस सुनील प्रदीप झोरे, रायगड (शहर) जिल्हाध्यक्ष संतोष रामा शिंगाडे, सरचिटणीस चंद्रकांत बिरू बावदाने, मुंबई जिल्हाध्यक्ष विकास प्रकाश अडुळकर, सरचिटणीस मंगेश गंगाराम वरक, नवी मुंबई अध्यक्ष संजय दादासाहेब सातपुते, सरचिटणीस सतीश सुभाष खरात यांचा समावेश आहे.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी समाजाच्या हिताचे काम करतील, असा विश्वास व्यक्त करत करताना सर्व पदाधिकाऱ्यांना कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



