मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
आमदार किरण सामंत यांची खरवते गोरेवाडीला सदिच्छा भेट

राजापूर : तालुक्यातील खरवते गोरेवाडी येथे आमदार किरण सामंत यांनी नुकतीच सदीच्छा भेट दिली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आमदार श्री. सामंत यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रत्नागिरी जिल्हा धनगर समाज संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास गोरे, राजापूर तालुकाध्यक्ष प्रकाश झोरे, अॅड. लक्ष्मण गोरे, सानिका गोरे, राजाराम गोरे, संतोष गोरे, मनिषा गोरे, ओंकार गोरे, आर्यन गोरे यांसह वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी गोरेवाडीच्यावतीने आमदार श्री. सामंत यांना विविध मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. त्यावर चर्चा करताना वाडीचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आमदार श्री. सामंत यांना आश्वासित केले.



