मुख्य बातमी
रत्नागिरीतील दोन तरुण नायजेरियन समुद्री चाचेंच्या ताब्यात

रत्नागिरी : एमव्ही बीटू (imo no ९९१८१३३) हे डांबर वाहतूक करणारे जहाज वेस्ट आफ्रिकेच्या हद्दीत गेल्यानंतर समुद्री चाचेंच्या (पायरेट्स) ताब्यात सापडले. या जहाजावर एकूण १८ क्रू मेंबर असून यातील १० जणांना हे हल्लेखोर आपल्या सोबत घेऊन गेले आहे. या दहा जणांमध्ये सात भारतीय तर तीन रोमेनियन नागरिक आहेत. यामध्ये समीन जावेद मिरकर (रा. भटकरवाडा, पेठकिल्ला, रत्नागिरी) आणि रिहान शब्बीर सोलकर (रा. कर्ला) या दोन रत्नागिरीतील तरुणांचा समावेश आहे.

