मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

अहमदाबाद–मंगळुरू साप्ताहिक विशेष रेल्वेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

खेड, चिपळूण, रत्नागिरीसह कोकणातील प्रवाशांना दिलासा

खेड : कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने अहमदाबाद– मंगळुरू साप्ताहिक विशेष रेल्वे (गाडी क्रमांक ०९४२४) ३१ जुलैपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही विशेष रेल्वे दर शुक्रवारी दुपारी ४ वाजता अहमदाबाद येथून सुटणार असून दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजता मंगळुरू येथे पोहोचणार आहे. वाढीव कालावधीनुसार ही सेवा ३ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत उपलब्ध राहणार आहे.

या गाडीमध्ये एसी द्वितीय श्रेणी, एसी तृतीय श्रेणी, स्लीपर तसेच जनरल द्वितीय श्रेणीचे डबे असणार आहेत. नडियाद, आनंद, वडोदरा, भरुच, सुरत, वापी, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड तसेच गोवा आणि कर्नाटकातील विविध स्थानकांवर या गाडीला थांबा देण्यात आला आहे.

या विशेष रेल्वेचे आरक्षण ३० जूनपासून सर्व पीआरएस आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. सुट्यांचा हंगाम आणि वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे गुजरात, कोकण आणि कर्नाटकदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!