पालपेणे शाळा नं. २ च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अमित खांडेकर यांची निवड

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील पालपेणे शाळा नं. २ च्या नुकत्याच झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत समितीच्या अध्यक्षपदी अमित गंगाराम खांडेकर यांची, तर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अवनी नरेश टाणकर यांची निवड करण्यात आली.
या सभेला शाळेचे माजी मुख्याध्यापक दत्ताराम समगिस्कर, मुख्याध्यापक विश्वास सावंत, मदन गिजे, अशोक पाटे, मनोहर पवार तसेच माजी अध्यक्ष राजेश घाणेकर, माजी अध्यक्ष विनायक घाणेकर, सदस्य परेश कदम तसेच श्री. पवार, माजी उपाध्यक्ष सुहाना आदवडे व इतर सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित खांडेकर यांनी सांगितले की, “शाळा व्यवस्थापन समितीने माझ्यावर विश्वास ठेवून समितीचे अध्यक्षपद बिनविरोध दिले आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभारी असून सर्वांच्या सहकार्यातून शाळेची शैक्षणिक प्रगती करण्यावर भर दिला जाईल. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास आणि पालक व शाळा यांच्यात अधिक दृढ समन्वय निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असेल.” अमित खांडेकर यांचे अभिनंदन करण्यात येत असून शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.



