मुख्य बातमी
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत उद्या रक्तदान शिबिर

रत्नागिरी : शिवसेनेचे माजी आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी युवासेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर उद्या (१३ जून) सकाळी १० वाजता माजी खासदार विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालय, यशोधन अपार्टमेंट गाळा नंबर १, अभ्युदयनगर येथे होणार आहे. तसेच सकाळी ११ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात खाऊ वाटप केले जाणार आहे. रक्तदान शिबिरात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे.


