मुख्य बातमी

रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदाचा शिल्पा सुर्वे यांनी पदभार स्वीकारला

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही

रत्नागिरी : तब्बल नऊ वर्ष रिकाम्या असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर लोकनियुक्त नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे आज (२९ डिसेंबर) मोठ्या दिमाखात विराजमान झाल्या. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावून नवनिर्वाचित नगराध्यक्षांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या विशेष सोहळ्याला रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक रवींद्र उर्फ अण्णा सामंत, शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर, तालुकाप्रमुख महेश म्हाप, महिला संघटक कांचन नागवेकर, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब परुळेकर आणि भैरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र सुर्वे यांच्यासह शहरातील सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.

या प्रसंगी नवनियुक्त नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते उपस्थित सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामुळे पालिकेच्या नवीन कार्यकाळाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

यायावेळी बोलताना नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे म्हणाल्या की, “रत्नागिरी शहरासाठी अपेक्षित असणारी सर्व प्रलंबित विकासकामे पूर्ण करणे आणि नागरिकांच्या हिताचे उत्तम काम करणे याला माझे सर्वोच्च प्राधान्य असेल. सर्वांना सोबत घेऊन शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”

शिल्पा सुर्वे यांच्या पदभार स्वीकारण्यामुळे रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात नवा उत्साह पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!