आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांसाठी आज विशेष ऑनलाईन मार्गदर्शन सत्र 

रत्नागिरी : आंबा पिकावरील फुलकीड नियंत्रण, मोहोर संरक्षण आणि इतर कीड-रोग व्यवस्थापनासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ सरसावले आहे. दोन्ही विभागांच्या संयुक्त विद्यमाने आंबा उत्पादकांसाठी विशेष वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. आज (२६ फेब्रुवारी) सायंकाळी ६ वाजता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट शास्त्रज्ञांकडून तांत्रिक मार्गदर्शन मिळणार आहे. बदलत्या हवामानामुळे आंबा पिकावर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या वेबिनारमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ शास्त्रज्ञ बागायतदारांशी थेट संवाद साधून तांत्रिक माहिती देतील. कीड व रोग नियंत्रण यावर प्रामुख्याने फुलकीड (Thrips) आणि इतर रोगांवर प्रभावी व वेळेत करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली जाणार आहे. मोहोर संरक्षण बदलत्या वातावरणात आंबा मोहोर टिकवून धरण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याबाबत माहिती दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या बागेतील समस्यांबाबत शास्त्रज्ञांना थेट प्रश्न विचारून उत्तरे मिळवता येणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. आपल्या बागेचे रक्षण आणि दर्जेदार उत्पादनासाठी या वेबिनारमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी आपल्या भागातील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे.

वेबिनार लिंक ओपन करण्यासाठी येथे क्लिक करा 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!