भारत शिक्षण मंडळामार्फत शिक्षक व शिक्षकेतरांचा सत्कार

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शिक्षक दिनानिमित्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतरांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

माध्यमिक विभागातील इंग्रजी व संस्कृत विषयाचे अभ्यासक जयेश जयचंद गुरव यांना “भारत शिक्षण मंडळाचा आदर्श शिक्षक पुरस्कार” प्राप्त झाला. तसेच ज्युनियर कॉलेजच्या मराठी विषयाच्या प्राध्यापिका सौ. मानसी चव्हाण यांना “युनायटेड उद्योग समूहाचा आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान करण्यात आला. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी सौ. अवंतिका आंबेकर यांना “भारत शिक्षण मंडळाचा आदर्श शिक्षकेतर पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.

या सोहळ्याप्रसंगी उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांनी पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.



