मुख्य बातमी

मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात चिपळूण, दापोली, गुहागर विधानसभा मतदारसंघ राज्यात अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांकावर

रत्नागिरी : भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम एसआयआर १०० टक्के कामकाज पूर्ण करून राज्यात अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक जिल्ह्यातील चिपळूण, दापोली आणि गुहागर या तीन विधानसभा मतदारसंघांनी मिळवला आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिली.

चिपळूण विधानसभा मतदारसंघ १०० टक्के मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण कामकाज करून राज्यात पहिला ठरला आहे. दापोली विधानसभा मतदारसंघ हा राज्यात दुसरा, तर गुहागर मतदारसंघ हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदार संघाचे ९८.७६ टक्के, तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे ९१.३८ टक्के आज अखेर मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण अंतर्गत कामकाज झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!