मुख्य बातमी

आयटीआय राजापूर येथे तासिका तत्त्वावर निदेशकांच्या जागा

७ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : मधू दंडवते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शैक्षणिक वर्ष २०२६ साठी विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘शिल्प निदेशक’ या पदांच्या जागा तासिका तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपला संपूर्ण बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड साक्षांकित प्रति आणि पासपोर्ट साईज फोटोसह आपले अर्ज ‘शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजापूर, जिल्हा – रत्नागिरी’ या पत्यावर जमा करायचे आहेत. उमेदवारांना मुलाखतीची तारीख व वेळ स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, अशी माहिती मधु दंडवते औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजापूरचे प्राचार्य एम.बी. गवई यांनी दिली आहे.

शिल्प निदेशक इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकस तासिका : पदसंख्या- १ पात्रता- इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक विषयातील डिग्री / डिप्लोमा सह १ वर्षाचा अनुभव किंवा आयटीआय इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (NCVT ) उत्तीर्ण आणि २ वर्षांचा अनुभव. निदेशक गणित / ड्रॉइंग पदसंख्या-१ पात्रता- मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील डिग्री/(बी ई मेकॅनिकल) / डिप्लोमा आणि १ वर्षाचा अनुभव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!