पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत कराटे चॅम्पियनशिप २०२५ चे आज रत्नागिरीत आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कराटे असोशिएशन आयोजित कराटे चॅम्पियनशिप २०२५ छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे आज (२५ डिसेंबर) आयोजित करण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार असून सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत स्पर्धक ,पालक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रत्नागिरी जिल्हा कराटे असोशिएशन कडून करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हा कराटे असोशिएशन मागील ३५ वर्षांहून अधिक काळ यशस्वीरित्या कार्यरत असून असोशिएशन च्या माध्यमातून आजपर्यंत लाखो विद्यार्थी प्रशिक्षण घेवून विविध स्तरावर विभागात कार्यरत आहेत. दरम्यान २०२५ च्या कराटे चॅम्पीयनशिप साठी तब्बल चारशेहून अधिक स्पर्धक सहभागी होणार असल्याचे असोशिएशनचे अध्यक्ष जावेद मिरकर यांनी सांगितले.
सन १९९४ पासून आजतागायत अव्याहतपणे कराटे प्रशिक्षण सुरू असल्याचा फायदा स्व -संरक्षणासाठी रत्नागिरीकर मोठ्या प्रमाणावर करीत असल्याची माहिती असोशिएशनचे सचिव ॲड. सूरज बने यांनी दिली. तसेच पूरातन भारतीय कलेचा वारसा रत्नागिरीकरांसह पोलीस कमांडो यांच्यासाठी देखील होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या मूळ कलेकडे वळावे, असे आवाहन असोशिएशनचे खजिनदार व मुख्य प्रशिक्षक अरुण बेग यांनी केले आहे.
आजच्या काळात हत्याराविना स्वसंरक्षण तसेच इतरांचे संरक्षण करण्यासाठी नव्या पिढीने पुढे येणे आवश्यक असल्याचे मत असोशिएशनचे सल्लागार प्रशांत जाधव यांनी व्यक्त केले.



