मुख्य बातमी

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी ३ एप्रिल रोजी मतदान

जास्तीत जास्त पात्र मतदारांनी मतदान करावे : सहाय्यक उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषद मुंबईच्या निवडणुकीसाठी ३ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. जास्तीत जास्त पात्र मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन महाराष्ट्र वैद्यकीय परिषद मुंबई निवडणूक २०२५ सहाय्यक उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक १७ जानेवारी २०२५ असाधारण क्रमांक ३ मध्ये प्रसिध्द झालेल्या निवडणूक निर्णय अधिकारी, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषद मुंबई निवडणुका २०२५ नुसार महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषद मुंबईची निवडणुकीसाठी ३ एप्रिल रोजी मतदान सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.

जिल्ह्यासाठी खाली नमुद ठिकाणी मतदान केंद्र स्थापित करण्यात येणार आहेत. निवडणूक लढविणारे उमेदवार ४१ असून त्यापैकी ९ उमेदवारांना निवडून द्यावयाचे आहे. मतदान केंद्र क्र. रत्नागिरी – २/१ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होडेकर रोड, पटवर्धनवाडी रत्नागिरी – शरीररचना शास्त्र विभाग, तळमजला, खोली क्र. १ येथे १ ते २५० असे २५० मतदार मतदानासाठी निश्चित केलेले आहेत. मतदान केंद्र क्र. रत्नागिरी – २/२ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होडेकर रोड, पटवर्धनवाडी रत्नागिरी –शरीररचना शास्त्र विभाग, तळमजला, खोली क्र. २ येथे २५१ ते ५०० असे २५० मतदार मतदानासाठी निश्चित केलेले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!