महाराष्ट्रमुख्य बातमी

इंडियन स्टुडंट कौन्सिलचे सावित्रीच्या लेकी राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान 

पुणे : इंडियन स्टुडंट कौन्सिल गेल्या पाच वर्षापासून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये डॉ. सुरेंद्र पाटील यांना म.ज्योतिबा फुले समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजर्षी छ. शाहू महाराज राज्यस्तरीय पुरस्कार चिन्मयी सुमित, अनिल कलकुटकी, डॉ. जगन्नाथ गोपाळ यांना, तर या वर्षीच्या राष्ट्रीय सावित्रीच्या लेकी या पुरस्काराच्या मानकरी म्हणून महाराष्ट्रातून सांस्कृतिक क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री विभावरी देशपांडे, राजकीय क्षेत्रातील मुंबईच्या माजी माहपौर किशोरी पेडणेकर व संशोधन क्षेत्रातील प्रा. डॉ. सरिता मालवीय, (मध्यप्रदेश) यांना प्रदान करण्यात आला.

राज्यस्तरीय ‘सावित्रीच्या लेकी’ या पुरस्काराच्या मानकरी संशोधन क्षेत्रातील प्रा. डॉ. अरुणा वाघोले, पत्रकारिता क्षेत्रातील प्राची घाणेकर, साहित्य क्षेत्रातील अस्मिता चांदणे, शिक्षण क्षेत्रातील पल्लवी पुजारी, सामाजिक क्षेत्रातील वैशाली सावळे, करुणा विमल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

साऊ-ज्योतिबा आदर्श लेखणी पुरस्कार प्रज्ञा बाली, प्रा. डॉ. नीता समद्दार, प्रा. डॉ. मंजुश्री जाधव, प्रा. डॉ. साधना चटलांनी (संशोधन), राज्यस्तरीय विशेष सावित्रीच्या लेकी अश्विनी दीक्षित (शैक्षणिक), अंजली कुंदरगी (सांस्कृतिक), सोनिया इथापे (सामाजिक), गौरी प्रभूणे (शैक्षणिक) यांना देण्यात आला. राष्ट्र सेवा दलातील आणि छात्रभारतीत घडलेल्या कार्यकर्त्यांच्या मुली डॉक्टर इंजिनीअर झाल्या आहेत त्यांचा ही सावित्रीची लेक म्हणून अभिनेत्री सुषमा देशपांडे व कवी व गायक अरुण म्हात्रे यांच्या हस्ते सन्मान व पुरस्कार प्रदान करण्यात प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ. ज्ञानोबा कदम यांनी केले. प्रास्ताविकेत इंडियन स्टुडंट कौन्सिल गेल्या पाच वर्षांपासून केलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली व ठरावाचे वाचन केले. शेवटी साथी पन्नालाल सुराणा व डॉ. बाबा आढाव आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पुरस्काराला उत्तर देताना चिन्मयी सुमित म्हणाल्या, “मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पण त्या पुरस्कारांपेक्षा हा जबाबदारीची जाणीव करून देणार आहे. मी मराठी शाळेसाठी कायम काम करीत राहीन.”

यावेळी विभावरी देशपांडे, किशोरी पेडणेकर, प्राची घाणेकर यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीमती सुषमा देशपांडे यांनी काळानुसार सावित्रीबाई फुलेंच्या प्रयोगाची खूप गरज असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी अरुण म्हात्रे यांनी उंच माझा झोकाचे शीर्षक गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाच्या यशवतेसाठी प्रा. माधुरी राऊत, डॉ. माधवी माहके, प्रा. आरती खातू, प्रा. कल्पना सिद्धेवाड, सारिका शिंदे, सुवर्णा शिंदे, क्रांती दामा, प्रा. डॉ. धनाजी थोरे, डॉ. रोहित गायकवाड, ममता बार्डोले यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!