काँग्रेस पक्षाकडून खराब रस्त्यांविरुद्ध ८ सप्टेंबर रोजी आंदोलन

रत्नागिरी : सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत तीन पैकी एक असलेल्या शिरगाव ग्रामपंचायतीचे सदस्य गेल्या १५ वर्षांपासून तेच आहेत, तरीही रस्त्यांची अवस्था खूपच वाईट आहे. वीज समस्या, पाण्याची टंचाई, कधी बदलणार?l, असा प्रश्न उपस्थित करत ८ सप्टेंबर रोजी प्रशासन रस्ते चांगले करण्याचा निर्णय घेईपर्यंत काँग्रेसने या रस्त्यांवर रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला आहे.


तारवैभव, फोडकर कॉम्प्लेक्स, जन्नत अपार्टमेंट शिरगाव ग्रामपंचायतीचा पटवर्धन वाडी रस्ता या ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. प्रत्येक निवडणुकी वेळी आश्वासन देऊनही मूळ समस्या जिथल्या तिथे असल्याची प्रचिती ग्रामस्थांना येत आहे. ग्रामस्थ कर भरतात. हे पैसे कुठे वापरले जातात हे जाणून घेण्याचा प्रत्येक ग्रामस्थाचे कर्तव्य असून तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळेच काँग्रेसने पुकारलेल्या या आंदोलनाला नागरिकांनी पाठिंबा देण्याचे आवाहन असे आवाहन आतिफ साखरकर, शाहरुख वागळे, इरफान होडेकर, जैनुल सारंग, फहिम फणसोपकर, शेहबाज होडेकर, आकिब काझी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले आहे.





