मुख्य बातमी
नारायणी महिला मंडळातर्फे नाचणे मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम

रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राम्हण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे नाचणे येथील नवलाई पावणाई जाकादेवी, महापुरूष जाकादेवी मंदिरात नारायणी महिला मंडळाचा “स्त्री शक्तीचा जागर” हा कीर्तनाचा कार्यक्रम उत्साहात झाला.

या वेळी विशाखा भिडे यांनी आपल्या कीर्तन सादर करून उपस्थित महिलांना मंत्रमुग्ध केले. या वेळी स्वरपेटीची साथ सौ. सायली मुळ्ये तर तबलासाथ सौ. प्राची रानडे यांनी दिली. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी श्रीनिवास जोशी, राजेंद्र पटवर्धन, अनंत आगाशे, सुधाकर वैद्य यांच्यासह महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
या संस्थेतर्फे विविध सामाजिक उपक्रमही राबविले जात असल्याचे यावेळी पटवर्धन यांनी सांगितले.


