सतीमाता आदर्श युवक मंडळ गुरववाडी लांजा च्या वतीने गुरववाडी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा

लांजा : येथील सतीमाता आदर्श युवक मंडळ गुरववाडी यांच्या वतीने १८ ते २० एप्रिल या कालावधीत गुरववाडी चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा नारकर पटांगणावर होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या क्रिकेट संघाला रोख रुपये ३०००१ आणि चषक तर उपविजेत्या संघाला २०००१ व चषक असे बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेतील मालिका वीराला सायकल व चषक, उत्कृष्ट फलंदाजाला बॅट व चषक, उत्कृष्ट गोलंदाजाला शूज व चषक तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याला आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
ही स्पर्धा एक वाडी व एक गाव अशा गटात खेळवण्यात येणार आहे. गाव मर्यादित गटामध्ये एक ग्रामपंचायत व एक गाव अशी खेळवण्यात येईल. प्रथम येणाऱ्या २४ संघांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी २५०० रुपये प्रवेश फी ठेवण्यात आलेली आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी किरण गुरव मोबाईल 9049635484, सुरज गुरव 7798 867252, रुपेश गुरव 9579153667 यांच्यासह आशिष राणे, सुमित गुरव, अभिषेक गुरव, विवेक कनावजे, महेश लाड, प्रथम गुरव, प्रसाद राणे यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे.



