‘कोकण दर्शन’मध्ये आंबोळगड, पूर्णगड आणि कृषी पर्यटनाची सफर

रत्नागिरी : आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या ‘कोकण दर्शन’ या कार्यक्रमातून आंबोळगड, पूर्णगड आणि कृषी पर्यटनाची सफर घडवून आणली जाणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी (४ सप्टेंबर) रोजी सकाळी ८.४० वाजता आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित होणार आहे.
या कार्यक्रमात दुर्ग अभ्यासक संयोगिता सासणे आणि गणेश रानडे सहभागी झाले आहेत. आंबोळगड आणि पूर्णगडाचा इतिहास, दुर्गवैशिष्ट्ये तसेच कृषी पर्यटनाच्या माध्यमातून कोकणातील पर्यटनाला मिळणाऱ्या संधींविषयी माहिती या कार्यक्रमातून जाणून घेता येणार आहे. कार्यक्रमाचे लेखन सोनाली सावंत यांनी केले असून निवेदन आणि निर्मिती सहाय्य वंदना मुसळे आणि सोनाली सावंत यांचे आहे. विवेक वानखडे कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत.
हा कार्यक्रम ११४३ KHz मध्यम लहरी, १०१.५ MHz एफ.एम. तसेच Newsonair मोबाईल ॲपवर ऐकता येईल. प्रसारानंतर हा कार्यक्रम श्रोत्यांना एआयआररत्नागिरी या युट्यूब चॅनल वर ऐकता येईल.



