शिमगोत्सवानिमित्त खोडदे येथील श्री नवलाईदेवीच्या सहाणेवर १८ मार्च रोजी विविध कार्यक्रम
गावातील जेष्ठ नागरिकांचा सन्मान : कालकाई देवी रिमिक्स नमन मंडळाचा कार्यक्रम

आबलोली : गुहागर तालुक्यातील खोडदे येथील श्री नवलाईदेवीच्या सहाणेवर होलिकोत्सव, शिमगोत्सव उत्सवानिमित्ताने खोडदे ग्रामस्थ मंडळ खोडदे मुंबई यांच्या वतीने गावातील (वय वर्ष ७५ पासून पुढे) ज्येष्ठ नागरिकांचा गौरव सोहळा १८ मार्च रोजी रात्री १० वाजता करण्यात येणार आहे.

त्यानंतर आई इच्छापूर्ती नवलाईदेवी देवस्थान खोडदे सहानवाडी आणि खोडदे ग्रामस्थ मंडळ खोडदे मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रात्री १०:३० वाजता श्री कालकाई देवी रिमिक्स नमन मंडळ वाटद (ता. रत्नागिरी) यांचे लोकप्रिय बहुरंगी, बहुढंगी नमन सादर करण्यात येणार असून नव्या शैलीतील तालबद्ध खेळे, नवीन गाणी आणि वगनाट्य सादर करण्यात येणार आहे.

या संपूर्ण कार्यक्रमाला खोडदे गावातील आणि खोडदे पंचक्रोशीतील जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन खोडदे ग्रामस्थ मंडळ खोडदे मुंबई यांनी केले आहे.



