मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
पाचेरीसडा येथील बंधाऱ्याचे विक्रांत जाधव यांच्या हस्ते उद्घाटनq

आबलोली : गुहागर तालुक्यातील पाचेरीसडा पंड्येवाडी येथील चाफवण्याचा पऱ्या येथे आमदार भास्कर जाधव यांनी मंजूर केलेल्या बंधाऱ्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक विनायक मुळ्ये, तालुका प्रमुख सचिन बाईत, विभाग प्रमुख रवींद्र आंबेकर, शाखा प्रमुख संतोष आंब्रे, युवा सेना प्रमुख सागर डिंगणकर, पंड्येवाडीचे अध्यक्ष कृष्णा पंड्ये, गावकर पंड्ये, अनिल जोशी, ग्रामपंचायत अधिकारी विश्वनाथ पावरा यांचेसह वाडीतील मुंबई व गावचे स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला बहुसंख्येने उपस्थित होते.



