रत्नागिरी शहरातील खालचा फगरवठारातील काही भाग जलमय; घरांना धोका
महामार्गाच्या कामांचा फटका

रत्नागिरी : शहरात आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली असून, या पावसात शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. शहरातील खालचा फगरवठार येथील पाटणकर आणि दीक्षित यांच्या घरच्या अंगणात चिखल वाहून आला. रस्त्याच्या कामामुळे या परिसरातील काही घरांना धोका निर्माण झाला आहे.
कालपासून रत्नागिरीत पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. रात्रभर सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी जलसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी ही कामे अर्धवट स्थितीत असल्याने या कामांचा फटका परिसरातील नागरिकांना बसत आहे. शहरातील खालचा फगरवठार येथेही काही घरांना बसला आहे.
खालचा फगरवठार भागात तेथील वाडीमध्ये घरांच्या बाजूला चिखल झाला आहे. महामार्गाच्या कामामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे बोलले जात आहे.


