मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हासामाजिक
गणेश कदम यांच्याकडून वडेरू जि. प. आदर्श शाळेला प्रिंटर भेट

आबलोली (संदेश कदम) : जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वडेरू (ता. चिपळूण) येथे गणेश महादेव कदम यांनी सामाजिक जाणीवेतून शाळेला प्रिंटर भेट म्हणून दिला.
श्री. कदम यांनी यापूर्वीही शाळेला मोठ्या प्रमाणात वस्तू रुपात देणगी देऊन सहकार्य केले आहे. या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. शैक्षणिक उठावातून प्रिंटर मिळवून देण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर आत्माराम उकार्डे व सहशिक्षक रमेश भिकाजी लोंढे यांनी विशेष प्रयत्न केले. मुखाध्यापक सुधाकर उकार्डे यांनी श्री. कदम यांचे आभार मानून धन्यवाद दिले.


