मुख्य बातमी

रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाचवे मरणोत्तर नेत्रदान व देहदान

रत्नागिरी : शहरातील मुरलीधर मंदिर आवार, बंदररोड येथे राहणारे वासुदेव बाळकृष्ण सप्रे (वय ८७ वर्ष) यांचे देहदान आज (१७ एप्रिल) शासकीय वैद्यकीय महाविद्याल येथे करण्यात आले.

वासुदेव सप्रे यांचे १६ एप्रिल रोजी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान व देहदानसाठी संकल्प केला होता. त्यानुसार त्यांचा मुलगा हेमंत वासुदेव सप्रे व मुलगी सौ. संपदा सुनील जायदे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथे सप्रे यांची नेत्रदान प्रकिया पूर्ण केली व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी देहदान केले.

यावेळी समाजसेवक समीर करमरकर व विनायक शितुत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सप्रे यांचे देहदान आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे करण्यात आले.

देहदानाच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, डॉ. मंजुषा रावळ, शरीररचनाशास्त्र विभागातील कर्मचारी पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, शिपाई मिहीर लोंढे तसेच वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीचे समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव यांनी काम पाहिले.

वासुदेव बाळकृष्ण सप्रे यांनी रत्नागिरीतील प्रसिद्ध मुरलीधर मंदिराचे सुमारे ६० वर्ष पुजारी म्हणून कार्य केले. रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशाला व गोदूताई जांभेकर विद्यालय येथे लिपिक म्हणून सेवा दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!