जिल्ह्यात यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे खबरदारीचे आवाहन

रत्नागिरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात २७ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह व वादळीवा याह पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या कालावधीत विजा चमकत असताना खबरदारीचे उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी. विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विदयुत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत.
दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा. विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्यासाठी आपल्या मोबाईलवर ‘दामिनी ॲप’ डाऊनलोड करून घ्यावे.
पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दुर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्हा आपती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी : 02352-226248 /222233. व्हॉट्स ॲप 7057222233, जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी : 02352 222222. पोलीस टोल फ्री हेल्पलाईन : 112 / 02352 222363
महावितरण, रत्नागिरी नियंत्रण कक्ष
तहसील कार्यालय रत्नागिरी : 7875765018/ 02352-223127
तहसील कार्यालय लांजा : 02351 – 230024
तहसील कार्यालय राजापूर : 02353-222027
तहसील कार्यालय संगमेश्वर : 02354-260024
तहसील कार्यालय चिपळूण 02355-252044/9673252044
तहसील कार्यालय खेड : 02356-263031
तहसील कार्यालय दापोली : 02358-282036.
तहसील कार्यालय गुहागर : 02359-240237
तहसील कार्यालय मंडणगड : 02350-225236
हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in/ या संकेतस्थळावरून घ्या.
कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (02352) 222233 / 226248 किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 वर संपर्क करा.
हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.



