मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

राजापूरच्या पोलीस निरीक्षकपदी अमित यादव

राजापूर : तालुक्याच्या पोलीस निरीक्षकपदी अमित यादव यांची नुकतीच नियुक्ती झाली असून, राजापूर तालुक्यात दोन महिन्यांपूर्वी जी शांतता होती तशीच शांतता यापुढे कायम राहिल याकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित करणार असल्याचे आश्वासन पदभार स्वीकारल्यानंतर श्री. यादव यांनी दिले.

या आधी राजाराम चव्हाण यांनी राजापूर तालुका पोलीस निरीक्षक पदाचा कारभार उत्तमरित्या संभाळला होता. त्यांची बदली झाल्यानंतर नाटे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी काही दिवसांसाठी राजापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून काम सांभाळले. १९ मार्च रोजी अमित यादव यांनी राजापूर पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारून राजापूर तालुक्यात शांतता आणि सुव्यवस्था कशी राहिल याकडे लक्ष केंद्रित केले आहे.

अमित यादव यांनी या आधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस पोलीस ठाणे, वैभववाडी पोलीस ठाणे, कणकवली पोलीस ठाणे या ठिकाणच्या संवेदनशील भागात काम पाहिले आहे. एक वर्षापूर्वी त्यांची रत्नागिरी जिल्ह्यात नियुक्ती झाली. संगमेश्वर, देवरुख या ठिकाणहून आता त्यांनी नुकताच राजापूरचा पदभार स्विकारला आहे.

“छोट्या छोट्या कारणांमुळे समाजामध्ये मोठा वाद निर्माण होईल अशी स्थिती निर्माण करू नये. पूर्वापार आपल्या परंपरा आहेत, त्या मान्य करून आपली लहान मुले, आया, बहिणींच्या मनात भीतीचे वातावरण तयार होईल, अशी स्थिती निर्माण होणार नाही. याची प्रत्येकाने काळजी घेताना सर्वांनी शांतता कशी राखता येईल याची जबाबदारी घेतली पाहिजे, असे आवाहन श्री. यादव यांनी जनतेला केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!