मुख्य बातमी

भाट्ये येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरी ते पावस रस्त्यावरील भाट्ये येथे ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात. स्वाराचा जागीच मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीसाठी स्वाराचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला आहे. महेश अनंत पिलणकर (वय ४८, रा. टाकळे वाडी, फणसोप, रत्नागिरी) असे मृत स्वाराचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २३) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास भाट्ये पूल येथे घडली.

महेश हे फिनोलेक्स कंपनीत कामाला होते. ते आपल्या दुचाकीवरुन रत्नागिरीकडे येत असताना ट्रक चालक बाजू घेऊन जात असताना हा अपघात झाला असल्याचा चर्चा रुग्णालयात सुरु होती. मात्र अपघात घडल्याची माहितीही ट्रक चालकाला नव्हती. ट्रक चालक काही अंतर गेल्यानंतर नागरिकांनी ट्रक चालकाला थांबविले आहे. या अपघातात महेश पिलणकर यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याचा चेहरा चेपला गेला असून ट्रक चालकाच्या हौद्याची जोरदार धडक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे.

महेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. महेशच्या मृत्यूची माहिती मिळताच टाकळेवाडी-फणसोप येथील त्यांच्या नातेवाईक व मित्रपरिवार, नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली आहे. शहर पोलिस ठाण्यात या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!