ठाकरे शिवसेना महिला कार्यकारणीचा रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्यातील तालुकानिहाय दौरा

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग महिला लोकसभा संपर्कसंघटक नेहा माने, रत्नागिरी जिल्हा महिला संपर्कसंघटक मीनल जुवाटकर व सर्व महिला तालुका संपर्क संघटक यांचा रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्यातील तालुकानिहाय महिला कार्यकारणी दौरा २२, २३, २४ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे.
बुधवारी (२२ जुलै) दुपारी १ वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय (ता. चिपळूण), सायंकाळी ४ वाजता सौ. नेहा माने यांचे निवासस्थान, देवरुख (ता. संगमेश्वर), २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालय, रत्नागिरी. दुपारी ३ वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय, लांजा. २४ जुलै सकाळी १० वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय (राजापूर) येथे होणार आहे.
यावेळी तालुक्यातील सर्व उपजिल्हा संघटक, विधानसभा क्षेत्र संघटक, तालुका संघटक, शहरसंघटक, उपतालुका संघटक, उपशहर संघटक, विभागसंघटक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, उपविभाग संघटक, शाखा संघटक, लोकप्रतिनिधी, आजी माजी पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा महिला संघटक वेदा फडके, रत्नागिरी जिल्हा महिला समन्वयक स्वरूपा साळवी यांनी केले आहे.


