पाडावेवाडी-मिरजोळे मंडळ व जीवनदान ग्रुपतर्फे शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

रत्नागिरी : ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान‘ या उक्तीचा प्रत्यय देत रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या रक्ता तुटवडा भासत आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ‘जीवनदान ग्रुप ब्लड नेटवर्क, रत्नागिरी‘ आणि ‘माघी गणेशोत्सव मंडळ, पाडावेवाडी मिरजोळे, रत्नागिरी‘ यांच्या संयुक्त विद्यमाने, रत्नागिरी जिल्हा शासकीय रक्तपेढीच्या सहकार्याने तातडीने विशेष रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
आज (२ ऑक्टोबर) या शिबिराला रक्तदात्यांनी सहभाग आणि सामाजिक बांधिलकी जपत अनेक रुग्णांसाठी संजीवनी ठरण्याचे कार्य केले. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत हे शिबिर पार पडले. यात तरुणांनी उत्साहाने रक्तदानासाठी पुढे आले. रक्तदात्यांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे रक्तपेढीतील रक्तसाठा वाढण्यास मोठी मदत झाली आहे.
या उपक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन आयोजक राजेश नार्वेकर आणि सुरज पाडावे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष दीपक गावकर, नागेश पाडावे, सुरज पाडावे, अमित पाडावे, विजय पाडावे, पंकज पाडावे, रोहन कोलगे, शुभम कोलगे, वैभव पाडावे, आदींची उपस्थिती होती. या सामाजिक उपक्रमात मोलाचा वाटा उचलणाऱया सर्व रक्तदात्यांचे, आयोजकांचे आणि शासकीय रक्तपेढीच्या वैद्यकीय पथकाचे उपस्थितांकडून विशेष आभार मानण्यात आले. सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वितरण रक्तपेढी कर्मचारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.



