आरोग्यमुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

प्राथमिक आरोग्य केंद्र वाडीलिंबू येथे जागतिक क्षयरोग दिन उत्साहात

लांजा : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वाडीलिंबू येथे २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन प्राथमिक आरोग्य केंद्र वाडीलिंबू येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक कामत, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराज नवले यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र वाडिलिंबूचे आरोग्य निरीक्षक दिलीप गुरव यांनी माहिती क्षयरोगा विषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, “क्षयरोग हा मायक्रो बॅक्टेरिया टूबरक्युलसीस या जंतूमुळे तो. हा कुठलाही दैवी कोप किंवा शाप नाही. या आजाराचा प्रसार हवेमार्फत होतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने शिंकताना किंवा खोकताना रूमालचा वापर करावा. व इतरत्र सार्वत्रिक ठिकाणी थुंकू नये. या आजाराची प्राथमिक लक्षणे, भूक मंदावणे, दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा खोकला, दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा ताप, मानेवर गाठी येणे, वजनात लक्षणीय घट इत्यादी लक्षणे असता तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र वाडिलिंबू किंवा आरोग्य कर्मचारी, तसेच गावपातळीवरील आशाताईं यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन केले.

तसेच आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तात्काळ विनामूल्य थुंकी तपासणी केली जाते. आणि पुढील एक्सरे करण्यासाठी एकत्रित पेशंट गोळा करून स्वतंत्र गाडीची व्यवस्था करून तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात येते. तसेच शुगर, बीपी च्या पेशंट ला एक दिवस जरी ताप, खोकला असेल तरी थुंकी तपासणी करून घ्यावी. क्षयरूगणाला शासनामार्फत प्रत्येक महिन्याला १००० रूपये पोषण आहार साठी त्यांच्या बॅक खाते त्यांच्या सहा महिने दिले जातात, असे श्री. गुरव यांनी सांगितले.

या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक कामत, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराज नवले, औषध निर्माता गणेश लकडे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी श्रीमती मानसी मांडवकर, आरोग्य सेविका श्रीमती शर्वरी मोर्ये, अमर वाळंबे, पंकज कालकर आदी उपस्थित होते. शेवटी उपस्थित ग्रामस्थांचे गणेश लकडे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!