खोडदे सहाणवाडी येथे श्री नवलाईदेवीच्या सहाणेवर विविध कार्यक्रम संपन्न
खोडदे ग्रामस्थ मंडळ खोडदे - मुंबई मंडळातर्फे गावातील जेष्ठ नागरिकांचा सन्मान

आबलोली : गुहागर तालुक्यातील खोडदे येथील श्री नवलाईदेवीच्या सहाणेवर होलिकोत्सव – २०२५ निमित्ताने खोडदे ग्रामस्थ मंडळ खोडदे, मुंबई मंडळाच्या वतीने खोडदे गावातील ७५ वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते नुकतेच सन्मान करण्यात आला.


यामध्ये श्रीमती लक्ष्मी अनंत साळवी, श्रीमती सुलोचना परशुराम साळवी, श्रीमती सीताबाई श्रीधर साळवी, श्रीमती इंदिराबाई पंढरीनाथ साळवी, श्रीमती शकुंतला नाना पांचाळ, श्रीमती सुरेखा राजाराम पांचाळ, श्रीमती शोभा एकनाथ साळवी, श्रीमती शारदा वासुदेव साळवी, श्रीमती अरुणा विष्णू साळवी, गोपीनाथ रामचंद्र साळवी, अनंत शांताराम साळवी, प्रभाकर राजाराम साळवी, वसंत तुकाराम साळवी, हरिश्चंद्र तुकाराम साळवी, परशुराम अर्जुन साळवी यांचा समावेश होता. यावेळी नमनवाले ओमकार शितप, स्टेजवाले प्रकाश साळवी, ढाल काठी निशाण लावणारे रमेश डिंगणकर, स्पिकरवाले सुनील पवार, आबलोलीमधील पत्रकार संदेश कदम, माय कोकण युटूब चॅनलचे संदीप रत्नू मोहिते, विशेष आर्थिक सहकार्य करणारे विनोद रघुनाथ साळवी यांचाही सन्मान करण्यात आला.


मंडळाचे अध्यक्ष विजय महादेव साळवी, अध्यक्ष प्रकाश लक्ष्मण साळवी, सचिव दीपक दत्ताराम साळवी, सचिव राजेंद्र पंढरीनाथ साळवी, उपाध्यक्ष संजय वसंत साळवी, उपाध्यक्ष शरद रघुनाथ साळवी, खजिनदार उदय सुधाकर साळवी, उप सचिव राजेंद्र सीताराम साळवी, उप खजिनदार सुरेश केशव साळवी, सदस्य रवींद्र गणपत साळवी, दशरथ रघुनाथ साळवी, संदेश गजानन साळवी, धनदीप परशुराम साळवी यांच्या हस्ते सर्व सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश केशव साळवी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त शिक्षक दशरथ रघुनाथ साळवी यांनी केले. या सन्मान सोहळ्यानंतर रात्री १०.३० वाजता श्री कालकाई देवी रिमिक्स नमन मंडळ वाटद, ता. जि. रत्नागिरी यांचे लोकप्रिय बहुरंगी, बहूढंगी नव्या शैलीतील तालबद्ध खेळे, नविन गाणी आणि वगनाट्य सादर करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाला खोडदे गावातील आणि खोडदे पंचक्रोशीतील जनता बहुसंख्येने उपस्थित होती.




