महाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

विधानसभेच्या अंदाज समिती आणि आश्वासन समितीवर आमदार किरण सामंत यांची निवड

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सन २०२४-२५ या वर्षासाठी विधानमंडळाच्या अंदाज समिती आणि आश्वासन समितीवर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष यांनी २६ मार्च रोजी विधानसभा सदस्य आमदार किरण सामंत यांची नियुक्ती केली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या अंदाज समिती आणि आश्वासन समित्या या सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवणाऱ्या आणि जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत आहे की नाही, याची खातरजमा करणाऱ्या महत्त्वाच्या समित्या आहेत. अंदाज समिती ही राज्याच्या अर्थसंकल्पावर बारकाईने नजर ठेवते, तर आश्वासन समिती सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होते की नाही, याचा आढावा घेते.

या दोन्ही समित्यांवर आमदार किरण सामंत यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निवडीबद्दल आमदार सामंत यांचे अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!