राजापूर येथे महाआरोग्य शिबीर संपन्न

राजापूर : महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा, सार्वजनिक आरोग्य विगाच्यावतीने ग्रामीण रुग्णालय राजापूर येथे बुधवारी २६मार्च रोजी सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन राजापूरच्या उपविभागीय अधिकारी डाॅ. जास्मिन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशफाक हाजू, जिल्हा संघटक प्रकाश कुवळेकर, शहर प्रमुख सौरभ खडपे, महिला शहर प्रमुख हर्षदा खानविलकर, विभाग प्रमुख नाना कोरगावकर, कार्यालय प्रमुख मधुकर बाने, संपर्क अधिकारी प्रसन्न मालपेकर, शाखा प्रमुख मधुरा खानविलकर, उमेश पराडकर, अभय मेळेकर, अनिल कुडाळी आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिरामध्ये मधुमेह, मानसिक आरोग्य, उच्च रक्तदाब, असंसर्गजन्य आजार, हृदयविकार, क्षयरोग तसेच सर्व प्रकारच्या कॅन्सर रुग्णांच्या तपासण्या करून उपचार करण्यात आले. तसेच रक्तातील साखर, रक्तदाब, स्तनांचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, बेडका तपासणी, छातीचा एक्सरे, इसीजी काढण्यात आले.
शिबिरामध्ये रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अतुल ढगे, फिजिशियन, छाती आणि फुफ्फुस रोग तज्ज्ञ डॉ. एन. एच. पावसकर यांनी उपस्थित राहून शिबिरामध्ये नाव नोंदणी केलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली आहेत. शिबीर यशस्वी करण्यासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राम मेस्त्री आणि त्यांच्या सहकारी व कर्मचार्यांनी मोठी मेहनत घेतली.


