Uncategorized

अर्थसंकल्पातील अन्य महत्त्वाच्या घोषणा

नवी दिल्ली : वित्तीय तूट जीडीपीच्या 4.5% पेक्षा कमी राहील.

चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 4.4% राहील.

2026-27 मध्ये वित्तीय तूट जीडीपीच्या 4.3% राहण्याचा अंदाज आहे.

दिव्यांगजन कौशल्य योजना राबवणार

दिव्यांग सहारा योजना – अपंगांना कृत्रिम अवयव, उपकरणं देण्यासाठीची योजना

केंद्रीय दिव्याशा केंद्र – अपंग, ज्येष्ठ नागरिकांसाठीची विशेष दुकानं

नॅशनल मेंटर हेल्थ इन्स्टिट्यूट – रांची आणि तेजपूर

पूर्वेकडच्या शहरात 5 नव्या पर्यटन केंद्रांचा विकास करणार

ईशान्येकडच्या राज्यात बुद्धिस्ट सर्किटचा विकास करणार. बौद्ध देवळं – मॉनेस्ट्रीचं जतन, पुनरुज्जीवन करणार.

महिला सशक्तीकरणासाठी She-Marts चा स्थापना

पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल कॉरिडोर होणार

पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत प्रवासी प्रणालींना प्रोत्साहन देण्यासाठी देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये 7 हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोर विकसित करणार

मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बेंगळुरू, हैदराबाद ते चेन्नई, चेन्नई ते बेंगळुरू, दिल्ली ते वाराणसी, वाराणसी ते सिलीगुडी असे हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोर होणार विकसित

दुसरं कर्तव्य – महत्त्वाकांक्षांना प्रोत्साहन देणं – त्या पूर्ण करणं

सेवा क्षेत्रासाठी हाय लेव्हल स्टँडिंग कमिटीची स्थापना. ही समिती वृद्धी, रोजगार, निर्यातीसाठीची क्षेत्र निवडून तिथे चालना देण्यासाठी काम करेल.

पुढच्या 5 वर्षांत 1 लाख AHP (Applied Health Professionals) तयार करण्यासाठी प्रयत्न करणार

5 क्षेत्रीय वैद्यकीय हबची स्थापना करणार. भारताला मेडिकल टुरिझमचं केंद्र बनवणार.

योगाला जगाच्या अनेक भागांत मान्यता आहे. कोव्हिडनंतर आयुर्वेदाला जागतिक ओळख नव्याने मिळाली.

3 नवीन ऑल इंडिया इन्स्टि. ऑफ आयुर्वेद, आयुष फार्मसी आणि लॅब्सचं आधुनिकीकरण, जामनगरमधल्या सेंटरचं आधुनिकीकरण करणार.

 

12 व्हेटर्नरी आणि पॅरा व्हेटर्नरी कॉलेज – संस्थांची स्थापना करणार

भारताल्या व्हिज्युअल इफेक्ट्स – कॉमिक्स सेक्टरसाठी – देशातल्या 15,000 शाळा कॉलेजांत यासाठीच्या लॅब्सची स्थापना करणार

नवीन नॅशनल इन्स्टि. ऑफ डिझाईनची पूर्व भारतात स्थापना.

5 य़ुनिव्हर्सिटी टाऊनशिप्सची स्थापना. त्यात विविध शैक्षणिक संस्था – राहण्याची सोय असतील.

प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठीच्या एका नवीन हॉस्टेलची स्थापना

4 टेलिस्कोप इन्फ्रा.ची स्थापना करणार वा सुधारणा करणार

पर्यटन – नॅशनल इन्स्टि. फॉर हॉस्पिटॅलिटीची स्थापना.

20 पर्यटन स्थळांवरील 10,000 गाईड्सच्या ट्रेनिंगसाठी 12 दिवसांचा कोर्स IIT च्या मदतीने राबवणार.

रेअर अर्थ’साठी मोठी घोषणा

अर्थमंत्र्यांनी रेअर अर्थसाठी मोठी घोषणा केली आहे.

ओडिशा, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये रेअर अर्थसाठी विशेष कॉरिडॉर

या कॉरिडॉरला रेअर अर्थ मॅग्नेट कॉरिडॉर असे नाव दिले जाईल.

इलेक्ट्रॉनिक्स घटकांच्या निर्मितीसाठी 40 हजार रुपये कोटींचा प्रस्ताव.

उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी कॉर्पोरेट मित्र योजनेची घोषणा

5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरातल्या पायाभूत सुविधा सुधारणार. 12.2 लाख कोटींचा शहर विकास निधी

सेमीकंडक्टर क्षेत्राची क्षमता वाढवण्यावर जोर देणार

शहरांमध्ये आर्थिक क्षेत्रं विकसित करणार

सेमीकंडक्टर क्षेत्राची क्षमता वाढवण्यावर जोर देणार – सेमीकंडक्टर मिशन 2.0 – 40 हजार कोटींची तरतूद

खाणकाम – प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी – रेअर अर्थ मिनरल मायनिंग कॉरिडोर. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये दुर्मिळ खनिज केंद्र उभारणार

3 मोठ्या केमिकल पार्कची स्थापना

कंटेनर उत्पादन क्षमता वाढवणार.

मेगा टेक्स्टाईल पार्क्सची स्थापना – महात्मा गांधी ग्रा

म स्वराज योजना – खादी – हातमाग – हस्तकलांना प्रोत्साहन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!