महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे मुंबईची कार्यकारणी जाहीर
संतोष खरटमोल यांची राज्य कोषाध्यक्ष पदी निवड

मुंबई : महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे मुंबई जिल्ह्याची २०२५-२६ वर्षासाठी कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून, संतोष खरटमोल यांची राज्य कोषाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र योगशिक्षक संघ ही संघटना महाराष्टातील योगशिक्षकांसाठी काम करणारी एकमेव संस्था आहे. देशात असो वा राज्यात अशा अनेक संस्था आहेत की ते योगशिक्षक घडवतात पण त्यांना योग्य ते मार्गदर्शन किंवा सर्टिफिकेशन झाल्यानंतर क्लास कसे घ्यायचे किंवा योगा शिकविण्याचा प्रोटोकॉल कसा असावा, साधारण फी किती आकारावी यावर सखोल माहिती महाराष्ट्र योगशिक्षक संघ ही संघटना योगशिक्षकांना देत असते.
या संघटनेच्या माध्यमातून योगशिक्षकांच्या हितासाठी राज्य सरकारकडे काही मागण्या संघटनेने लावून धरल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रात योग आयोग लागू व्हावा, शाळा व महाविद्यालयात योग विषयाला सुद्धा मान्यता द्यावी, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आरोग्यवर्धनीमार्फत योगसत्र घेणाऱ्या शिक्षकास नियमित करावे, शासकीय व निमशासकीय अस्थापनेमध्ये योगा ब्रेक नियमित करावा यासाठी योगतज्ञ नेमावा यांसारख्या एकूण १२ मागण्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार हे सतत याचा पाठपुरावा करत असतात.
डॉ. निलपवार त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई जिल्हा २०२५-२६ वर्षाकरिता ही निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष संतोष खरटमोल, उपाध्यक्षा मनुजा चव्हाण, महासचिव कृष्णकुमार शिंदे, सचिव हिरा गणवीर, कोषाध्यक्षा रिद्धी देवघरकर, मीडिया प्रभारी अमित चिबडे, संघटन सचिव अर्निका बांदेलकर, कार्यालय सचिव शालिनी भंडारी, जिल्हा महिला प्रकोष्ठ प्रभारी डॉ. पौर्णिमा काळे, लीगल सेल प्रभारी ॲड. माया देसाई, राज्य महिला प्रकोष्ठ प्रभारी सदस्य कांचन राणे, तसेच विशेष सदस्य म्हणून हेमवंता जिजाबाई, प्रशांत मकेसर, नीलेश साबळे, प्रियांका खाडे, सुषमा माने, साक्षी कलगुटकर, केशर कुलाबकर, श्वेता पिसाळ, विकास ओव्हाळ, विजयालक्ष्मी शर्मा, रेश्मा धुरी, जयदीप कनकीया, वर्षा शर्मा, ईश्वरी शिंदे, प्रसाद काठे, राजेश्री मोरे, अनिता अल्वा, दिलीप घाडगे, प्रभा शेट्टी, उज्वला महामुनकर, सुवर्णा पोटे, भारती जगताप आदींची नावे २०२५-२६ वर्षासाठी महाराष्ट्र योगशिक्षक संघ राज्याचे कोषाध्यक्ष व मुंबई जिल्हा अध्यक्ष संतोष खरटमोल यांनी जाहीर केले.


