अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका इसमास अटक
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई

रत्नागिरी : रत्नागिरी पोलिसांकडून सुरू असलेल्या अमली पदार्थ विरोधातील मोहिमेअंतर्गत आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. मन्सुर अली निजाम पठाण (वय ४० वर्ष रा. मिरज जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली असून, पठाण याच्याकडून ५ किलो ५५.५ ग्रॅम वजनाचा असा मिळून ३ लाख २५ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे एनडीपीएस ऍक्ट १९८५ चे कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात काही इसम अमली पदार्थांची खरेदी-विक्री करत असल्याची माहिती रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती. या अनुषंगाने रत्नागिरी शहरात अमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याचे सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी दिल्या होत्या.
या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांच्यामार्फत रोजनिहाय अमली पदार्थ खरेदी विक्री करणार्यांबाबत गोपनीय माहिती प्राप्त करण्याचे कामकाज सुरू आहे.
दिनांक ७ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्याम आरमाळकर व पोलीस अंमलदार हे कोकणनगर ते प्रशांतनगर अशा परिसरात गस्त घालत असताना साईभूमी नगर इमारतीच्या मागील बाजूला एक इसम संशयास्पद हालचाल करत असल्याचे निदर्शनास आले. पोलीस पथकाने त्याला जागीच थांबवून त्यांची चौकशी केली. त्याची पंचांच्या समक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या अंग झडतीमधून एक लाल रंगाची प्रवासी बॅग व त्यामध्ये पाच ब्राउन कलरचे प्लॅस्टिक पाऊच ज्यामध्ये उग्र वासाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ मिळून आला. आरोपी मन्सुर अली निजाम पठाण याच्याकडून ५ किलो ५५.५ ग्रॅम वजनाचा असा मिळून ३ लाख २५ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे एनडीपीएस ऍक्ट १९८५ चे कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील पो.उ.नि, श्याम आरमाळकर, सपोफौ दीपक साळवी, पोहेकॉ अरुण चाळके, पोहेकॉ अमोल भोसले, पोहेकॉ आशिष भालेकर, पोहेकॉ पंकज पडेलकर, पोहेकॉ भालचंद्र मयेकर, पोकॉ अमित पालवे, पोकॉ कौस्तुभ जाधव यांनी बजावली.


