मुख्य बातमीराजकारण

खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

रत्नागिरीतील ना. प. अभ्यंकर निरीक्षण गृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न आणि धान्य वाटप

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस रत्नागिरीत विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने जिल्हा बाल कल्याण समितीच्या ना. प. अभ्यंकर निरीक्षण गृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न आणि धान्य वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश चिटणीस सौ. शिल्पा मराठे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे, रत्नागिरी शहराध्यक्ष राजन फाळके, माजी तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, जिल्हा पदाधिकारी उमेश कुलकर्णी, माजी शहराध्यक्ष सचिन करमरकर, जिल्हा चिटणीस अशोक वाडेकर, दादा ढेकणे, सौ. भक्ती दळी, शैलेश बेर्डे, सायली बेर्डे, नितीन गांगण तसेच सुधाकरराव सावंत, सहसचिव राजन पटवर्धन, अधीक्षक प्रथमेश वायंगणकर, विनोद पवार आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व संस्थाचालक सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!