तेज सोशल फाउंडेशन (महाराष्ट्र) या सामाजिक संस्थेचे लवकरच काम सुरू करणार : सौ. चैताली येरुणकर

आबलोली (संदेश कदम) : महिला सबलीकरण तसेच अनाथ मुलांना महिला आणि पुरुष यांना मदतीचा हात देणे यासह शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य व क्रीडा विकासासाठी युवक व युवती कल्याण कार्यक्रम वृद्धाश्रम व अनाथाश्रम यासाठी पुढाकार घेत मुंबई येथून तेज सोशल फाउंडेशन (कार्यक्षेत्र महाराष्ट्र) या सेवाभावी सामाजिक संस्थेची निर्मिती आणि स्थापना करण्यात येत असून लवकरच काम सुरू करणार असल्याची माहिती संस्थेच्या संस्थापिका, सामाजिक कार्यकर्त्या सौ. चैताली येरवणकर यांनी पत्रकारांना दिली.
याबाबत अधिक माहिती देताना सौ. येरुणकर म्हणाल्या की, “सर्वसामान्य जनतेला मदत करणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी शासनाच्या विविध जन कल्याण योजनांची मदत घेणार आहोत. या संस्थेत विविध भागातील सामाजिक कार्यकर्ते काम करणार आहेत. जिल्हा स्तरावर विविध भागात तेज सोशल फाउंडेशन या संस्थेची नोंदणी केल्यानंतर पुढील कामांना सुरुवात केली जाणार आहे. या संस्थेचे मुख्य कार्यालय मुंबई जोगेश्वरी येथे असणार आहे.”


