बालभारतीचे सेवानिवृत्त विशेषाधिकारी डॉ. अजयकुमार लोळगे यांची पटवर्धन हायस्कूलला सदिच्छा भेट

रत्नागिरी : बालभारती सेवानिवृत्त विशेषाधिकारी, कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, संरक्षण शास्त्र, स्व विकास व कलारसास्वाद, माहिती व तंत्रज्ञान, खेळू करू शिकू, आरोग्य व शारीरिक शिक्षण, संरक्षण शास्त्र, रस्ता सुरक्षा या विषयांच्या पाठ्यपुस्तकांचे प्रमुख संयोजक डॉ. अजयकुमार लोळगे यांनी भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलला सदिच्छा भेट दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. लोळगे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका श्रीमती कल्पना शिरोळकर तसेच माजी मुख्याध्यापक विजय वाघमारे, प्रशालेचे पाचवी ते बारावीचे शिक्षक वृंद उपस्थित होते. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पटवर्धन हायस्कूलचे उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. ज्येष्ठ शिक्षक संदीप कांबळे यांनी आभार मानले.


