मुख्य बातमी
जि. प. शाळा पूर्णगड नं.१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

रत्नागिरी : तालुक्यातील जि. प. शाळा पूर्णगड नं.१ या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शाळेचा विद्यार्थी संकल्प सुर्वे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा करून आला होता. ही वेशभूषा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती.

या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपली भाषणे करून डॉ. आंबेडकरांना आदरांजली वाहिली. मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा मनोगतातून व्यक्त केला. शाळेच्या या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती,पालक यांनी समाधान व्यक्त केले आहे.



