मुख्य बातमीशैक्षणिक

आबलोलीतील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन परिचय स्पर्धा

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन परिचय स्पर्धा घेण्यात आली.

डॉ. बाबासाहेबांच्या जीवनाचा, त्यांच्या कार्याचा व देशाला लाभलेल्या योगदानाचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा उद्देशाने सर्व विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहिती पुस्तिका पुरवण्यात आली होती. या माहिती पुस्तिकेवर आधारित प्रश्नांवर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये यशस्वी प्रत्येक वर्गातील प्रथम क्रमांकास बक्षीस देण्यात आली. ही बक्षीसे लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे कोषाध्यक्ष रमाकांत (नाना) विष्णू साळवी यांच्यामार्फत देण्यात आली.

स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी असे : समर्थ शैलेश दिंडे (इयत्ता पाचवी), अद्वैत सुरेश ठोंबरे इयत्ता पाचवी), निधी संतोष पागडे (इयत्ता सहावी), अक्षरा संदेश सावंत (इयत्ता सातवी), हिंदवी दत्तात्रय राठोड (इयत्ता आठवी), प्रथमेश प्रशांत जाधव (इयत्ता नववी), रुद्र राकेश साळवी (इयत्ता नववी).

या परीक्षेच्या यशस्वीतेसाठी दिनेश नेटके, नितीन जगताप, वैभव ढवळ यांचे मौलिक योगदान लाभले. प्राचार्य डी. डी. गिरी यांचे मार्गदर्शन लाभले. लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे कार्याध्यक्ष सचिन बाईत यांच्यासह सर्व कार्यकारिणीने या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!