महाराष्ट्रमुख्य बातमी

मुंबई जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत २० हजार ५०० कोटींचे सामंजस्य करार

मुंबई : मुंबई विभागाची जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद रविंद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या गुंतवणूक परिषदेमध्ये विविध उद्योगांच्या माध्यमातून सुमारे २०,५०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

उद्योग विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या परिषदेच्या माध्यमातून यशस्वीतेने राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात आलेली गुंतवणूक ही माझ्या उद्योग विभागाने राबविलेला उपक्रम यशस्वी झाल्याचा मला अभिमान आहे. देशातले सर्वात उत्कृष्ट पायाभूत सुविधा देणार महाराष्ट्र राज्य असून उद्योजकांची पहिली पसंती महाराष्ट्राला आहे हे उद्योग विभागाच यश आहे. सामाजिक उपक्रमांमध्येही उद्योग विभाग चांगले काम करत आहे आणि यापुढेही राज्याच्या प्रगतीमध्ये उद्योग विभाग कायम अग्रेसर राहील असे आश्वासन यावेळी उद्योगमंत्री सामंत यांनी दिले.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून जिल्हा गुंतवणूक परिषदेचे भागधारक एमआयडीसी, म्हाडा, एमएमआरडीए, तसेच मुंबई महानगरपालिका यांची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू आहे, असे यावेळी सामंत यांनी म्हटले.

यावेळी राज्याचे उद्योग विकास आयुक्त दिपेन्द्रसिंह कुशवाह, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, तसेच मुंबई प्राधिकरण विभागाचे उद्योग सहसंचालक प्रकाश रेखाळकर, उद्योजक व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!